कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल सक्रिय झालेला आहे. गावागावात बैठकिंचा धडाका, प्रचारसभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. कारखान्याचे तत्कालीन चेअरमन डॉ.सुरेश भोसले आणि त्यांचे नातू अतुल भोसले आता रात्रंदिवस प्रचार करत आहेत आणि गेल्या पंचवार्षिकला केलेली कामे आणि भविष्यात करता येणाऱ्या कामांचा आराखडा सभासदांना पटवून देत आहेत. डॉ. सुरेश भोसले यांनी नुकताच कराड तालुक्यातील अंबवडे, कोळे आणि आणे येथे जाऊन प्रचारसभा घेतल्या आहेत.
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
हे पण वाचा, कृष्णा कारखान्यासाठी बोरगावमध्ये होणार संस्थापक पॅनल आणि सहकार पॅनल मध्ये काटे की टक्कर
यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्यात केलेल्या कामांबद्दल सभासदांना समजावून सांगितले आहे. गेल्या निवडणुकीत सहकार पॅनलने सभासदांना मोफत साखर देण्याचे वचन दिले होते. सत्ता आल्यानंतर गेल्या पाच वर्षांमध्ये सभासदांना प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर कारखान्यातर्फे देऊन दिलेले अभिवचन आम्ही पाळले आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये आम्ही अत्यंत चांगले आणि पारदर्शी काम केले आहे. येत्या काळातही कृष्णा सहकारी कारखाना सभासद शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यात येतील असे वचन देखील त्यांनी दिले आहे. कृष्णा कारखान्याच्या सर्वांगीण विकास आणि सभासदांच्या हिताचे निर्णय भोसले कुटुंबियांमुळे झाला आहे असे श्रीरंग देसाई यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?