कराड: सांगली आणि सातारा जिल्हासह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आली आहे. सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गट,डॉ. इंद्रजित मोहिते गट आणि अविनाश मोहिते गट यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्य लढत होणार आहे.दोन्ही मोहितें आणि सत्ताधारी भोसले या तीनही पॅनलकडून प्रचार जोरदार सुरु आहे . तीनही पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे आणि एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीये.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
प्रचाराची धुमाळी आता संपत आलेली आहे. यावेळच्या निवडणुकीमध्ये खरं पाहिलं तर एवढी मजा आलेली नाही. निदान आज आलेल्या गर्दीकडे पाहून मला एक निश्चित सांगावे वाटते की साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वात जास्त गर्दी ही सहकार पॅनलच्या सभांमध्ये आहे. जवळपास ८ आमदारांचा कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत थोडासा हस्तक्षेप आहेच. एक पोस्टर फिरत असताना मी वाचलं होत आणि त्याला काहीच अर्थ नव्हता. ते पोस्टर आमच्या लाडक्या बंधूंचं होत आणि ते दिशाभूल करणार होत. कारखान्याचे खासगीकरण करणे अशक्य आहे त्यामुळे विरोधकांनी मांडलेला खासगीकरणाचा मुद्दा हा सभासदांच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे.
हे पण वाचा, महाडिक गटाचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा; डॉ.सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंची घोषणा
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
२०१० साली अपघात झाला आणि अविनाश मोहितेंची कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सत्ता आली. त्यांच्यासारखी कारकीर्द नशिबाने कोणाचीच नव्हती आणि आगामी काळात देखील कुणी सत्तेत आल्यानंतर अशी कारकीर्द करू नये एवढंच. आपण म्हणतो आमुक आमुक याने बाई ठेवली वगैरे मात्र अविनाश मोहितेंनी चक्क बुवाच ठेवला होता. कारखाना चालविण्यासाठी अविनाश मोहितेंनी पत्रकाराला ठेवले होते. त्यांच्यात काळात अनेक अपहार देखील झाले. कारखान्याचे संचालक मंडळ हे भागिबोकड नाहीये आणि यामुळेच त्यांचं मनोमिलन फिस्कटलं होत. त्यामुळे आता कारखान्यात पुन्हा एकदा डॉ. सुरेश भोसले यांच्या हातात सत्ता द्यावी असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांनी सभासदांना केले आहे.
हे पण वाचा,
“कारखाना डबघाईला आणणारे विरोधक सभासदांचे काय भले करणार?’’ सुरेश भोसलेंनी घेतला विरोधकांचा समाचार