कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार होते. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते. चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली होती आणि आता जवळपास सर्वच जागांचे निकाल हाती लागले आहेत.
हे पण वाचा, भोसलेंची सलग दुसऱ्यांदा कारखान्यावर विक्रमी मताधिक्याने सत्ता; ‘असा’ आहे गटनिहाय २१ जागांचा निकाल निकाल
सांगली सातारा जिल्ह्यांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यात पुन्हा एकदा सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनलने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, माजी अध्यक्ष मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा सभासदांनी विश्वास दाखवलेला आहे. सर्वच्या सर्वच जागांवर जयवंतराव भोसले सहकार पॅनलला यश मिळाले आहे. या विजयाच्या मागे अनेक कारणे आहेत मात्र मिळालेला विजय हा आतापर्यंतच्या कारखान्याच्या निवडणुकीतील सर्वात मोठा विजय आहे. एवढा मोठा विजय आज पर्यंत कोणालाच मिळालेला नाही आणि मताधिक्य हे प्रत्येक उमेदवाराच्या मागे देखील विक्रमी आहे.
हे पण वाचा, साम, दाम, दंड, भेद सगळं वापरून इंद्रजित मोहितेंना विजयी करणार; सहकार मंत्री विश्वजीत कदम
असा झाला ऐतिहासिक विजय संपादित
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तशी मागच्याच वर्षी होणार होती मात्र कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. अखेरीस प्रशासनाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आणि निवडणुकीचे रणांगण चांगलेच पेटले. सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, वाळवा तालुका यांसारखे मोठे कार्यक्षेत्र असणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील दोन नंबरचा कारखाना. जवळपास आठ आमदार, मातबर मंत्री, माजी मुख्यमंत्री यांचे मतदारसंघ असणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण सत्ता केंद्र.
हे पण वाचा, सहकार पॅनलची विजयाकडे घौडदोड; कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात जेसीबीने गुलाल उधळण्यास सुरुवात
निवडणूक सुरु झाली आणि पारंपरिक वैरी म्हणजेच माजी चेअरमन डॉ. इंद्रजित मोहिते, अविनाश मोहिते आणि सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले हे एकमेकांच्या समोर ठाकले. डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांचे मनोमिलन करून डॉ. सुरेश भोसले सत्तेतून पायउतार करायचे अशी रणनीती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आखली. सत्ता आल्यावर मला हे पद ते पद करता करता मनोमिलन फिस्कटले आणि डॉ. सुरेश भोसलेंची निवडणूक आणखीच सोपी झाली.
हे पण वाचा, अविनाश मोहिते पाठोपाठ इंद्रजित मोहितेंचाही एकला चालो रे चा संदेश
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ,हात झटकून आता सभासदच निर्णय घेतील अशी भूमिका घेतली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज माघारीच्या वेळी राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न कृष्णेत राबविणार अश्या वावड्या उठल्या मात्र असे काहीच झाले नाही. डॉ. सुरेश भोसले यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आणि पक्षीय पातळीवर राजकारण होणार नाही असा संदेशच जणू दिला. अविनाश मोहिते हे राष्ट्रवादीचे युवक महाराष्ट्र प्रदेश चे पदाधिकारी असूनही राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना मदत मिळाली नाही. याउलट डॉ. सुरेश भोसलेंनी अगदी योग्य आणि चाणक्य नीतीचा वापर करत असे फासे फेकले ज्यात दोन्ही मोहिते चारी मुंड्या चीत झाले.
हे पण वाचा, मोहितेंच्या मनोमिलनासाठी मंत्री विश्वजीत कदम कऱ्हाडमध्ये ठाण मांडून; दोन्ही गटाचे कार्यकर्ते संभ्रमात
स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांची भूमिका नेहमीच किंगमेकरची असायची. यावेळी देखील तसेच झाली मात्र मागच्या बाजूनी. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अविनाश मोहितेंना पाठींबा दिला खरा मात्र त्यांचे अनेक कार्यकर्ते सहकार पॅनलच्या प्रचारात दिसून आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे देखील असे झाले. त्यांनी कोणतीही उघड भूमिका घेतली नाही मात्र डॉ. सुरेश भोसलेंना मिळालेल्या विक्रमी मताधिक्यात त्यांचाही तितकाच हात होता जेवढा जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा.
हे पण वाचा, दोन्ही मोहिते एकत्र न आल्यास सुरेश भोसलेंचा विजयी मार्ग सुखकर होणार
स्वर्गीय पतंगराव कदम यांचे आणि कृष्णेचे एक अनोखे आणि सलोख्याचे नाते होते मात्र त्यांच्या पश्च्यात सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम यांना सभासदांनी सपशेल नाकारले आहे असे म्हणायला हरकत नाही. १५ दिवस डॉ. विश्व्जीत कदम पायाला भिंगरी लावून रयत क्रांती पॅनलच्या डॉ. इंद्रजित मोहितेंचा प्रचार करत होते मात्र तिसऱ्या क्रमांकावर त्यांचे सर्व उमेदवार फेकले गेल्याने त्यांचा वरचष्मा अजिबात चालला नाही हे दिसून आले. या उलट दहा वर्ष कारखान्याचे चेअरमन राहिलेले मदनराव दादा मोहिते हे निशिच्त यशस्वी ठरले.
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी भोसले विरुद्ध मोहिते गटात रंगणार कलगीतुरा
कारखान्याच्या निवडणुकीत निश्चितच सभासदांनी डॉ. सुरेश भोसले आणि अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाला स्पष्ट साथ दिली. डॉ. सुरेश भोसले असो अथवा डॉ. अतुल भोसले या दोन्ही बापलेकांनी एकदाही वयक्तिक टीका केली नाही. त्यांनी गेल्या पाच वर्षांत सभासदांसाठी घेतलेले निर्णय प्रचारात अगदी योग्यरीत्या सभासदांसमोर मांडले आणि सभासदांच्या पचनी देखील ते पडले. डॉ. सुरेश भोसले यांचा जरी मावळ स्वभाव असला तरीदेखील राजनीतीच्या बाबतीत ते सर्वांनाच पुरून उरले हे मात्र नक्कीच.
हे पण वाचा, “कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एकतर्फी होणार”, डॉ. अतुल भोसलेंची वाळव्यात गर्जना
कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहितेंना ‘या’ कारणामुळे सभासदांनी नाकारले
डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या पॅनलला २००५ साली कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सत्ता मिळाली. याकाळात काही चांगले निर्णय घेण्यात आले मात्र एका पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये त्यांचे नाव आले. यामध्ये कोटींमध्ये अफरातफर झाली होती आणि शेतकरी तसेच कष्टकरी वर्गाचे पैसे पतसंस्थेत बुडाले असा आरोपही झाला. त्याचप्रमाणे अविनाश मोहितेंच्या कार्यकाळात देखील ५८ कोटींच्या कर्जावरून चांगलाच राडा झाला होता. १०३ दिवस अविनाश मोहिते आणि त्यांच्या संचालक मंडळाला तुरुंगवास भोगावा लागला होता. दोन्ही नेत्यांची अशी पार्श्वभूमी असल्याने त्यांना नाकारण्यात आले अशी चर्चा कृष्णा काठावर रंगलेली आहे.