कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते . चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली हहोती आणि प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्वाकडे पाऊल ठेवले आहे.
हे पण वाचा, सहकार पॅनलची विजयाकडे घौडदोड; कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात जेसीबीने गुलाल उधळण्यास सुरुवात
पहिल्या फेरीत जवळपास सर्वच जागांवर सहकार पॅनलचा दबदबा राहिलेला आहे. या नंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते मुख्य लढतीकडे ती म्हणजे तिन्ही माजी आणि आजी अध्यक्षांमधील लढाई आणि या लढाई मध्ये देखील सुरेश भोसले यांनी बाजी मारलेली आहे. डॉ. सुरेश भोसले हे रेठरे बुद्रुक मधून तब्ब्ल ५००० हजार मतांच्या आघाडीवर आहेत आणि लवकरच ते विजयी गुलाल घेण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुक मतमोजणीत सहकार पॅनलला विक्रमी आघाडी; दोन जागांवर विजयी सलामी
हे पण वाचा, जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व
डॉ. सुरेश भोसले यांना १० हजार ४९ मत मिळालेली आहेत. अविनाश मोहिते हे क्रमांक दोन वर असून त्यांना ५ हजार ७५ तर डॉ. इंद्रजित मोहिते यांना २ हजार ३७१ मत मिळाली आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली जयवंतराव भोसले सहकार पॅनल तब्ब्ल १३ जागांवर सरासरी ५ हजार मतांच्या फरकाने आघाडीवर आहे. डॉ. सुरेश भोसले समर्थकांनी आता कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात गर्दी कअरण्यात सुरुवात केलेली आहे. आघाडीवर असणाऱ्या सर्व उमेदवारांनी कृष्णा हॉस्पिटलच्या अंगणात जेसीबीने गुलाल उधळण्यास सुरुवात केलेली आहे.
हे पण वाचा,
विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा