कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते. चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली आहे आणि प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
पहिल्या फेरीत कराड तालुक्यातील बहुतांश तर दुसऱ्या फेरीत सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्राचा समावेश आहे .सुरुवातीच्या आलेल्या कलांनुसार आता जयवंतराव भोसले सहकार पॅनलला म्हणजेच सत्ताधारी सुरेश भोसले गटाला सभासदांनी कौल दिलेला आहे. पहिल्या फेरीच्या कलानुसार अनुसूचित जाती जमातीमधून विलास भंडारे, इतर मागास प्रवर्ग मधून वसंतराव शिंदे आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती मधून अविनाश खरात यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली होती.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल यांचे उमेदवार हे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पहिल्या तीन जागांच्या निकालानंतर महिला राखीव गटावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित केले झाले होते. यामध्ये देखील जयवंतराव भोसले सहकार पॅनलनेच बाजी मारली आहे. महिला राखीव गटातून नेर्ले येथील इंदुमती दिनकर जाखले तर बहे येथून जयश्री माणिकराव पाटील यांनी बाजी मारली आहे. एकंदरीत पाच जागांच्या लागलेल्या निकालात पाचही जागांवर सहकार पॅनलने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.
हे पण वाचा,
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा