कराड: कृष्णा कारखान्याने सातत्याने चांगला दर दिला आहे. जलसिंचन योजना व्यवस्थित चालविल्या आहेत. सभासदांना कारखाना चांगला चाललाय हे सभासदांना माहिती आहे. कृष्णा कारखान्याचा सभासद सूज्ञ असून, तो आता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असे प्रतिपादन कृष्णा कारखान्याचे चेअरमन आणि सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी केली. वडगाव हवेली (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष व उमेदवार जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, बबनराव शिंदे, सयाजी यादव, जयवंतदादा जगताप, संचालक पांडुरंग होनमाने, जगन्नाथ जगताप, माजी संचालक माणिकराव जाधव, जयवंत साळुंखे, पैलवान आनंदराव मोहिते, संभाजी निकम, पांडुरंग जगताप, वसंत जगताप, विक्रम मोहिते, राजेंद्र थोरात, सत्यवान जगताप, दिलीप चव्हाण, धनाजी जगताप, भानुदास जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे विरोधक काहीही प्रचार करत आहेत. भूलथापा देत आहेत. क्रियाशील – अक्रियाशील सभासद यांच्याबद्दल आरोप विरोधक करतात. मात्र ९७ वी घटना दुरुस्ती ही अविनाश मोहितेंनी सत्तेवर असताना स्वीकारली. त्यांच्या काळात यासाठी सभाही झाली. आता तेच टीका करत आहेत. कृष्णा कारखान्याची सत्ता ही सभासदांच्या हितासाठी असते. त्याठिकाणी असलेल्या पदाचे पावित्र्य आहे. भाऊ व आप्पांनी शेतकरी कल्याणासाठी काम केले. कृष्णा कारखान्यावर लाखो लोकांचे कुटुंब अवलंबून आहे. आम्ही गेल्या ६ वर्षात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. कृष्णा कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे सभासदांनी सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सहकार पॅनेलला विजयी करावे.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
हे पण वाचा, महाडिक गटाचा सहकार पॅनेलला जाहीर पाठिंबा; डॉ.सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंची घोषणा
यावेळी जगदीश जगताप म्हणाले, आमच्या संचालक मंडळासोबत कारखान्यात असणाऱ्या विरोधी संचालकांनी पाच वर्षात एकदाही कारभाराबाबत शब्द काढला नाही. कारण आम्ही पारदर्शकपणे कारभार केला. विरोधक घातक प्रचार करत आहेत. पण त्यांच्या अशा प्रचाराला कोणी भूलणार नाही. सहकारी संस्थेच्या निवडणुकीत काही बाहेरचे लोक साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूक लढवणार असल्याचे म्हणत आहेत. पण कृष्णा हा एक परिवार आहे. तिथं घरातले लोक ठरवणार आहेत कारभारी कोण होणार! डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला लोक भरघोस मतांनी विजयी करणार आहेत, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
हे पण वाचा, जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग; संस्थापक डॉ. सुरेश भोसले
जयवंतदादा जगताप म्हणाले, आम्ही सर्वजण विकासासोबत म्हणजेच डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत आहोत. कारखाना चांगला चालला आहे. आम्ही सहकार पॅनेलला मोठ्या मताने विजयी करणार आहोत. यावेळी भूषण जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीरंग साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. आभार अशोक जगताप यांनी मानले.