कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार 29 जूनला होत असून, या निमित्ताने कृष्णाकाठचे राजकीय वातावरण आता चांगलेच ढवळू लागले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
काल साखर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि याच दिवशी अनेक उमेदवारांनी पॅनलप्रमुखांच्या शब्दाला मान देत उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्याचप्रमाणे आज मोठ्या घडामोडी होणार अशी कृष्णा काठावर चर्चा होती आणि झालेही तसेच. जयंत पाटलांचे कट्टर समर्थक आणि राजारामबापू दूध संघाचे नेते विनायक पाटील यांची डॉ. अतुल भोसले यांनी भेट घेतली. यावेळी विनायक पाटील यांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनलला आपला खुला पाठींबा जाहीर केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत जयंत पाटलांची भूमिका नेहमीच जायंट किलरची राहिलेली असल्याने आता होणाऱ्या घडामोडींकडे विरोधी पॅनल प्रमुखांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, डॉ. सुरेश भोसले आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात कृष्णा साठी ‘खलबतं’; निवडणुकीचा सस्पेन्स वाढला
दुसरीकडे संस्थापक पॅनलच्या अविनाश मोहिते यांना स्वर्गीय मंत्री आणि नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र आणि काँग्रेसचे नेते ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. रयत पॅनलच्या डॉ. इंद्रजित मोहितेंना सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पाठींबा दिला आहे. आता कारखान्याची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि निवडणुकीची रंगत देखील तेवढीच वाढली आहे. सहकार पॅनलला आज मिळालेल्या पाठींब्यामुळे निवडणुकीत त्यांचा दबदबा कसा वाढतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दोन्ही मोहितेंच्या बिघडलेल्या मनोमिलनाचा फायदा सहकार पॅनलला दिसताना होत आहे.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?