कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता निवडणूक होणार आणि यावेळी देखील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात परिवर्तनाची लाट येणार की पुन्हा एकदा सहकार पॅनलचा कारखान्यावर दबदबा राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
रयत क्रांती पॅनलचे प्रमुख डॉ. इंद्रजित मोहिते सत्तेत असताना कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये ८० कोटी रुपये शिल्लक होते. डॉ. मोहितेंच्या काळात सुव्यवस्थित चालणाऱ्या कारखान्याला गेल्या दहा वर्षांमध्ये बेजबाबदार नेतृत्वांमुळे गालबोट लागले आणि सध्याची कारखान्याची स्थिती निंदनीय आहे. गेल्यावर्षी पारदर्शक कारभाराच्या जोरावर सोनहिरा साखर कारखान्याने राज्यात ३२५० रुपये इतका भाव शेतकऱ्यांच्या उसाला दिला. एवढाच दर सत्तेत आल्यावर कृष्णा सहकारी साखर कारखान्यात डॉ. इंद्रजित मोहितेंच्या नेतृत्वाखाली देण्यात येईल अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री डॉ. विश्व्जीत कदम यांनी सभासदांना दिली आहे.
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
तुमच्या पोटावर पाय देण्याची धमकी जर कोणी दिली तर त्याला घाबरवून जाऊ नका. तुमच्यावर आलेल्या पायाची जबाबदारी घेण्यास मी खंबीर आहे. कराड आणि वाळवा तालुक्यात प्रचार करत असताना सभासदांमध्ये रयत क्रांती पॅनलच्याबाबतीत एक वेगळा जोश निर्माण झालेला आहे. हे पाहिल्यावर सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले यांना शॉक बसल्याशिवाय राहणार नाही. या सत्ताधाऱ्यांनी कारखाना देशोधडीला लावण्याचे काम सध्या केलेले आहे. सोनहिरा साखर कारखान्याप्रमाणे कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये भाव द्यायचा असेल तर रयत क्रांती पॅनलला निवडणूक द्या अशी आर्त हाक डॉ. विश्व्जीत कदम यांनी सभासदांना मारली आहे.
हे पण वाचा,
जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग; संस्थापक डॉ. सुरेश भोसले
‘कृष्णा’चा सभासद विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाही; डॉ. सुरेश भोसले