इस्लामपूर : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी महाडिक गटाने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला आज जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. पेठ नाका येथे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, जि. प. सभापती जगन्नाथ माळी, कृष्णा बँकेचे संचालक नामदेवराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
यावेळी बोलताना राहुल महाडिक म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बैठकीत भोसले गटाला पाठिंबा देण्यासाठी बहुतांश कार्यकर्त्यांचा कल होता. नानासाहेब आणि भोसले परिवार यांचा जिव्हाळा होता. अतुलबाबा भोसले हे आमचा शब्दाला मान देतात. कृष्णा कारखाना सुरेशबाबांनी चांगला चालवला आहे. कोणावर टीकाटिप्पणी न करता अतुलबाबांशी असणारे मित्रत्वाचे पर्व पुढे चालवत, आमच्या गटाशी निगडित कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील Krushna Sakhar karkhana Mahadik Group’s support to the Sahakar panel
हे पण वाचा, सभासदांना मोफत साखर देणारा कृष्णा सहकारी साखर कारखाना देशात एकमेवच; डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
सम्राट महाडिक म्हणाले, रेठरे कारखाना ते रेठरे धरण या दरम्यानच्या स्व. नानासाहेब यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील. आमच्या आजच्या या निर्णयामुळे कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
हे पण वाचा,“कारखाना डबघाईला आणणारे विरोधक सभासदांचे काय भले करणार?’’ सुरेश भोसलेंनी घेतला विरोधकांचा समाचार
महाडिक गटाने सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. नानासाहेब यांच्या पश्चात राहुलदादा आणि सम्राटबाबा यांच्या पाठिंब्याने स्नेह आणखी घट्ट झाला असल्याचे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. सी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गिरीश पाटील, आनंदराव मोहिते, वैभव जाखले, बाबुराव गुरव, किरण उथळे, शंकर पाटील, जालिंदर शिंदे, बबन शिंदे, शंकर पाटील,रा हुल पाटील, हर्षवर्धन पाटील, सरगम मुल्ला, संजय घोरपडे, डी. के. पाटील, डी. के. कदम,वि शाल शेटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा,
कृष्णाकाठी अविनाश मोहितेंना बसणार मोठा धक्का; समर्थक सुरेश भोसलेंच्या पॅनलकडून लढण्याच्या मनस्थितीत
महिला राखीव गट: ‘त्या’ नऊ इच्छुक महिला उमेदवारांमुळे पॅनलप्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ
“विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
पॅनेल प्रमुखांच्या डोकेदुखीत वाढ: भोसले गट आणि जयंत पाटील गट यांची जवळीक आणखी वाढते की काय?