कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते . चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली आहे आणि प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत वडगाव – हवेली , काले कार्वे आणि नेर्ले – तांबवे या कारखाना गटातील 74 मतदान केंद्राची मतमोजणी सुरू आहे . तर नेर्ले – तांबवे या गटातील ७ मतदान केंद्राची मतमोजणी पहिल्या फेरीनंतर होणार आहे . यात वाठार , बेलवडे बुद्रूक , कालवडे गावासह कासारशिरंबे गावातील दोनपैकी एका केंद्राची मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे . मत पत्रिकांचे गटनिहाय विलगीकरण सुरू झाले आहे . आणि आता लवकरच निकाल हाती येण्यास सुरुवात झालेली आहे.
हे पण वाचा, विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
एक मतपेटी फोडल्यानंतर झालेले मतदान आणि मतपत्रिका यांची खातरजमा केली जाणार आहे . त्यानंतर गटनिहाय मतपत्रिका वेगळ्या करून मतमोजणी होणार आहे . दोन्ही फेरीत अशीच पद्धत वापरली जाणार आहे . पहिल्या फेरीत कराड तालुक्यातील बहुतांश तर दुसऱ्या फेरीत सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्राचा समावेश आहे .सुरुवातीच्या आलेल्या कलांनुसार पहिल्या फेरीमध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनलला म्हणजेच सत्ताधारी सुरेश भोसले गटाला ५५५० मतांची आघडी मिळालेली आहे. लवकरच या फेरीचा संपूर्ण निकाल हाती येणार आहे.