कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते. चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली आहे आणि प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा, सहकार पॅनलची विजयाकडे घौडदोड; कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारात जेसीबीने गुलाल उधळण्यास सुरुवात
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
एक मतपेटी फोडल्यानंतर झालेले मतदान आणि मतपत्रिका यांची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर गटनिहाय मतपत्रिका वेगळ्या करून मतमोजणी होणार आहे . दोन्ही फेरीत अशीच पद्धत वापरली जाणार आहे . पहिल्या फेरीत कराड तालुक्यातील बहुतांश तर दुसऱ्या फेरीत सांगली जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्राचा समावेश आहे .सुरुवातीच्या आलेल्या कलांनुसार पहिल्या फेरीमध्ये जयवंतराव भोसले सहकार पॅनलला म्हणजेच सत्ताधारी सुरेश भोसले गटाने बाजी मारलेली आहे.
हे पण वाचा, विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल यांचे उमेदवार हे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते. सहकार पॅनलचे भटक्या जाती/जमाती मधून अविनाश मधुकर खरात (खरातवाडी) हे विजयी झालेले आहेत. तर अनुसूचित जाती गटातून सत्ताधारी पॅनलचे विलास भंडारे हे देखील तब्ब्ल ५००० हजार मतांच्या आघाडीवर आहेत. संस्थापक पॅनलच्या शिवाजी आवळे यांना ४ हजार ६२३ मते तर रयतेच्या अधिकरराव भंडारे यांना २ हजार १७६ मते मिळाली आहेत. सहकार पॅनलने पहिल्याच फेरीत विक्रमी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
सहकार पॅनल (Sahakar Panel) :
सहकार पॅनल हे जयवंतराव भोसले यांनी १९८९ साली झालेल्या कारखान्याच्या पहिल्या निवडणुकीत स्थापन केले होते. पॅनलने आजपर्यंत १९९९ आणि २०१५ साली विजय मिळवलेला आहे. सत्तेत असताना दोन्ही वेळेस जयवंतराव भोसले यांचे पुत्र डॉ. सुरेश भोसले हे चेअरमन राहिलेले आहेत. सहकार पॅनलचे सुरेश भोसले यांची स्वच्छ प्रतिमा, त्यांचा १२ वर्ष कारखाना चालविण्याचा अनुभव, सहकारी संस्था व्यावसायिक रित्या चालवून फायद्यात ठेवण्याचा इतिहास, सोबतच त्यांचे पुत्र अतुल भोसले यांचा कराड तालुक्यातील वाढता राजकीय प्रभाव, सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार सोबत टिकवून ठेवण्यात आलेल यश ह्या सहकार पॅनलच्या जमेच्या बाजू आहेत.
हे पण वाचा,
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा