कराड: सातारा, सांगली जिल्हांसह पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखाना ताब्यात राहण्यासाठी महिनाभरापासून कृष्णाकाठावर रणधुमाळी सुरु होती. महिन्याभराच्या रणधुमाळीनंतर तिन्ही पॅनलमधील दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य मतदानातून ठरणार आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी मंगळवारी तब्ब्ल ९१ टक्के मतदान झाले होते . चुरशीच्या झालेल्या लक्षवेधी प्रचार यंत्रणांनंतर मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने निकालाची उत्सुकता वाढलेली आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, विरोधकांनी गेल्या ६ वर्षात सभागृहात तोंड का उघडले नाही? डॉ. सुरेश भोसले यांचे टीकास्त्र
आज कराड येथे वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठपासून ७४ टेबलावर मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३२५ अधिकाऱ्यांची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतमोजीसाठी फक्त प्राधिकृत केलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांनाच ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात येणार आहे असे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे . मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणण्यास सक्त मनाई असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा
‘या’ गावांमधील मते पहिली मोजली जाणार
तारुख , कुसुर , कोळेवाडी , अंबवडे , आणे , येणके , पोतले , किरपे , येरवळे , विंग , घारेवाडी , चचेगाव , वारुंजी , कराड , पार्ले , बनवडी , विरवडे , सदाशिवगड , गोवारे , टेंभु , सायपुर कोरेगाव , वडगाव हवेली , कोडोली , दुशेरे , तडसर , नेर्ली कोतवडे , उंडाळे , सवादे , तुळसण , येवती , म्हासोली , येळगाव , येणपे , टाळगाव , जिंती , ओंड , नांदगाव , ओंडोशी ,वडे , वाटेगाव , कासारशिरंबे , साळशिरंबे , बेलवडे गावच्या ७८ केंद्रावरील मते पहिल्या फेरीत मोजली जाणार आहेत. पहिल्या फेरी मध्ये जरी निवडणुकीचे निकाल स्पष्ट होणार नसले तरीदेखील कल नेमका कुणाकडे जाणार हे मात्र कळण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा,
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय विनायकराव पाटील यांचा सहकार पॅनलला जाहीर पाठींबा