राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येतील संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर “मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही” असे वक्तव्य केले होते.
शरद पवार यांच्या या वक्तव्याचा कुळगांव-बदलापुर शहर भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्येमाने गांधी चौक, कुळगांव कार्यालयाजवल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल ह्यांनी केलेल्या आदेशानुसार सोमवार दि. 27 जुलै 2020 रोजी भाजपा भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटिल तसेच मुरबाड आमदार किसन कथोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगांव बदलापुर शहर भारतीय जनता युवा मोर्चा ह्यांच्या संयुक्त विद्येमाने गांधी चौक येथील भाजपा कार्यालयाजवळ जाहीर निषेध व्यक्त करीत “जय श्रीराम” लिहिलेले दोन हजार पत्रे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या निवासी पत्त्यावर टपालव्दारे पाठविण्यात आली.