पुणे: महायुती सरकारने आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना निवडणुकीच्या तोंडावर ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचा दावा करत असतानाच, ही योजना आता वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. विशेषतः निधी वर्ग करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, सामाजिक न्याय विभागाचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवला जात असल्यावरून पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
संजय शिरसाट यांची भूमिकेत बदल
सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी सुरुवातीला त्यांच्या खात्याचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वर्ग करण्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. मात्र, आता दर महिन्याला त्यांच्या विभागातून हा निधी वर्ग केला जात असताना, त्यांची भूमिका बदललेली दिसतेय. विधान भवनात पत्रकारांशी बोलताना शिरसाट म्हणाले, “आता यावर वाद घालत नाही.”
नाशिक जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा कृषिमंत्र्यांना घेराव: “ओसाड गावच्या पाटीलकी” विधानावरून बाचाबाची!
“दर महिन्याला ४१० कोटींचा निधी वर्ग करावा लागतो” – शिरसाट
शिरसाट यांनी स्पष्ट केले की, “माझ्या खात्यामधून दर महिन्याला ४१० कोटींचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वर्ग केला जातो.” ही एकंदरीत प्रक्रियेचा भाग असून, दर महिन्याला या फाइल्स मंजूर कराव्या लागतात, असेही त्यांनी सांगितले. याबाबत आपल्याला माहिती असून, उपमुख्यमंत्र्यांनाही ही गोष्ट सांगितली आहे. “अजित पवार यांनी पैसे देण्याचे कबूल केले आहे. म्हणून मी आता वाद न घालता दर महिन्याला ४१० कोटींचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी देत असतो, ” असे शिरसाट यांनी स्पष्टपणे नमूद केले. ‘लाडकी बहीण’ योजनेतून २,२८९ सरकारी महिला कर्मचारी वगळल्या दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांवर सरकारने कारवाई केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ हजार २८९ महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे, कारण त्या सरकारी कर्मचारी होत्या आणि त्या योजनेसाठी अपात्र ठरल्या. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण न केल्याने विरोधक सरकारवर सतत हल्लाबोल करत आहेत. निधी वर्ग करण्याच्या या नव्या मुद्द्यामुळे ही योजना आणखीनच वादाच्या केंद्रस्थानी आली आहे.
पुण्यातून ‘जय गुजरात’ची घोषणा: एकनाथ शिंदेंच्या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता!
ठाकरे पिता-पुत्राला सरनाईकांचे जेवणाचे निमंत्रण: शिंदे गटात चर्चांना उधाण!
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राणेंचा निशाणा: ‘स्वार्थासाठीची धडपड!
चित्रा वाघ संतापल्या, आरोपीला अटक करा! पुण्यात कुरिअर बॉयच्या वेशात येऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार