मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालवली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दीदींना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले 27 दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या लवकरात लवकर बरं वाटवे यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जातायेत.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीत दाखल
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम दीदींच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहे. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर हलवले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक २४ तास रुग्णालयात हजर असते.
Veteran singer Lata Mangeshkar's health condition has deteriorated again, she is critical. She is on a ventilator. She is still in ICU and will remain under the observation of doctors: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital
(file photo) pic.twitter.com/U7nfRk0WnM
— ANI (@ANI) February 5, 2022
गेल्या ६-७ दिवसांपूर्वी डॉक्टरांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने व्हेंटिलेटर काढले होते. तेव्हा डॉक्टर प्रतित समदानी यांनी सांगितले होते की, त्यांची प्रकृतीत सुधारणा आहे, त्यामुळे त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे, परंतु त्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
राज ठाकरे रुग्णालयात
गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तातडीने ब्रीच कँडीत धाव घेतली असून डॉक्टरांकडून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
डॉक्टर काय म्हणाले?
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर आहे. तसंच अजूनही आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे.
मायकल लोबो वैफल्यग्रस्त झाल्यानेच भाजपच्या नेत्यावर टीका करत आहेत – उर्फान मुल्ला
काही दिवसांआधी डॉक्टरांनी लतादिदींच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा असं सांगितलं होतं. डॉक्टरांचं विशेष पथक लता दिदींवर उपचार करत आहे. डॉ. प्रतित समदानी यांनी काही दिवसांपूर्वी लतादिदींच्या हितचिंतकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.
Read also:
- उदयनराजे भोसले अजित पवारांच्या भेटीला; पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का? राजे म्हणतात…
- जबाबदारी मिळताच आशिष शेलारांकडून शिवसेनेला आव्हान; म्हणाले… लढाई आता…
- म्हापश्यात खरी लढत डिसुझा-कांदोळकर यांच्यातच
- मुंबईत सत्ता खेचून आण्यासाठी भाजपची वजीर चाल; आमदार आशिष शेलारांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
- म्हापसा मतदारसंघात जोशुआ यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित – नाईक