मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘निष्ठा’ या ॲप व वेब पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले असून याच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय शाळेतील शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
In order to be in sync with this fast-evolving world, our teachers need to constantly upgrade their world view, understanding, and methods of teaching. This first online #NISHTHA programme is a message that #COVID19 cannot stop our efforts for this cause. #DigitalLearning pic.twitter.com/YVc3D03IIm
— Sanjay Dhotre (@SanjayDhotreMP) July 16, 2020
केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले की, ‘निष्ठा’ हा मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे. याच्या माध्यमातून 42 लाख शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. ऑगस्ट 2019 ते मार्च 2020 पर्यंत 33 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 17 लाख 50 हजार शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता वेब पोर्टल व ॲपद्वार 25 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 23 हजार प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाईल
एनसीईआरटी, कैवल्य, अरविंदो सोसायटी, अजीज प्रेमजी, टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने ‘निष्ठा’ पोर्टल तयार करण्यात आले. हे प्रशिक्षण ‘निष्ठा’ पोर्टल, डीटीएच, स्वयंप्रभा चॅनेल, दीक्षा प्लॅटफॉर्म याद्वारे उपलब्ध होईल.