मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत येत आहेत. यातच नागपुरच्या मेयो शासकीय रूग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातच तेथील डॉक्टरांनी चक्क हातावर प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औषध आणालया रूग्णालयातून बाहेर जात असल्याचं देखील निर्दशनात आलं आहे. यावरून राष्ट्रवादीने तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांकडून बापटांना भावपुर्ण श्रद्धांजली”,म्हणाले की…,
आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराने अनेक दिवसांपासून राज्यातील जनता त्रस्त आहे. आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे सोडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत मात्र राजकारणात आणि फुशारक्या मारण्यात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने डॉक्टर हातावर गोळ्यांची नावं लिहून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यात दारुच्या नशेत असलेला कर्मचाऱ्याने लहान मुलीवर उपचार करताना डॉक्टरची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेची अशी दूरवस्था झाली असताना तानाजी सावंत जाहीर सभांमध्ये आपल्या बढाया सांगण्यात धन्यता मानत आहेत.
हेही वाचा…“१९ महिन्यांचा तुरूंगवास, पाच वेळा आमदार, खासदार, संघाचा कार्यकर्ता,” गिरीश बापटाचा संघर्षमय प्रवास
आरोग्यमंत्री कधी सत्ता पालटण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत आपण दिडशे बैठका केल्या असा गौप्यस्फोट करतात, तर कधी स्व. अटलबिहारी वाजपेयी, स्व. बाळासाहेब ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षाही जास्त गर्दी आपण जमवून दाखवली अशी स्वतःचीच पाठ थोपटतात. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्यास त्यांना सवड मिळणं कठीण दिसतंय. पण या अनास्थेमुळे जनतेच्या जीवाशी खेळ झाला तर त्याची जबाबदारी आरोग्यमंत्री घेणार काय? का असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
Read also
हेही वाचा…“आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, भाजपला संशय, मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा”
हेही वाचा…“साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं”, गिरीश बापटांच्या निधाननंतर चंद्रकांत पाटील भावूक
हेही वाचा…“मंत्रीपद अन् पालकमंत्रीपदावरून तानाजी सावंत नाराज, शिंदे गटात आलबेल नाही”?
हेही वाचा…“गिरीश बापट हे एक नम्र आणि कष्ठाळू नेते होते” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बापटांना भावपूर्ण श्रध्दांजली
हेही वाचा…चिंता नसावी..! संजय राऊतांनी सोनिया गांधी अन् राहुल गांधींची घेतली भेट