सातत्याने धावपळ किंवा कष्टाचे कामामुळे अनेकांना पाय दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. दिवसभर खुर्चीत बसून पाय लटकून राहिले असतील तरी पायदुखीची समस्या उद्भवते. काही जणांचे चप्पल आणि शूजमुळेही पाय दुखतात. आज आम्ही त्यावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
पायांना नियमित मालीश केल्यानेही पायांचा थकवा कमी होतो. खोबरेल तेलाने चांगली मालिश होते. इतर तेलही वापरू शकता.पाय जास्त दुखत असतील अथवा सूज आली असेल तर गरम पाण्यात मीठ टाकून त्यात दहा मिनिटांसाठी पाय बुडवून ठेवावे. गरम पाण्याच्या पिशवीने पाय शेकवावे.खुर्चीवर एक पाय ठेवावा. दुसरा पाय जमिनीवर सरळ ठेवावा. यानंतर कमरेतून खाली वाकत पायाच्या अंगठ्याला हात टेकवण्याचा प्रयत्न करावा. साधारण ५ ते १० सेकंदांपर्यंत हे करत राहावे. पाय दुखू नयेत. यासाठी आरामदायी चप्पल किंवा बूट वापरावे.