सोलापूर : “माझे नेते अजीत पवार आहेत, मुख्यमंत्र्याचं काय जाऊ दया तिकडं मरू दया तिकडं “, असे वक्तव्य करताना सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणेमामा यांची एका कार्यक्रमा प्रसंगी भाषणातून महापौर श्रीकांचना यन्नम यांना उद्देशून बोलताना अचानकपणे जीभ घसरली. त्यामुळे, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दत्ता भरणे यांचा निषेध करण्यात आला आहे.
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर कायद्याच्या कचाट्यात; लवकरच होणार चौकशी, वाचा काय आहे प्रकरण…
सोलापूर महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीम मी त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे ४३ एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांचा भांडवली निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल; स्वातंत्र्यादिनी मुख्यमंत्र्यांचा इशारा
या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांना भरभरुन कौतुक केलं त्यांना मुख्यमंत्री व्हा, असे म्हणत कौतुक केले. त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे दादा मला खूप काही मिळाला आहे. तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या, असे म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले.
शिवसेना महिला आघाडीकडून निषेध
सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक चुकीचे विधान केलं. त्या विधानात ते असे म्हणाले त्यांना एका गार्डन साठी परवानगी हवी होती तर ती परवानगी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री मरू द्या. आपण उपमुख्यमंत्र्यांकडून परवानगी मिळू असं त्यांनी एक विधान केलं. त्याला अनुसरून आपण महाविकास आघाडीतील एक मंत्री असतानाही मुख्यमंत्र्यांनी बद्दल आक्षेपर्ह वक्तव्य करतात ही चुकीची बाब आहे. त्याला अनुसरून शिवसेना महिला आघाडी कडून आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली असल्याची माहिती ढमाले स्वाती यांनी दिली.
Read Also :
- बाबासाहेबांनाही कधी वाटलं नसेल, भविष्यात असे राज्यपाल येतील म्हणून; हसन मुश्रीफांचा कोश्यारींवर घणाघात
- १२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले
- औरंगाबादेत स्वातंत्र्यदिनी एमआयएम’ने पालकमंत्री सुभाष देसाईंना दाखविले काळे झेंडे
- बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी मी आत्महत्या करेल; खासदार डॉ. अमोल कोल्हे आक्रमक
- शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली