पुण्यात उद्या रात्रीपासून म्हणजे १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून पाच दिवसासाठी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात कोराना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.
या निर्णयांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील या लॉकडाऊन चे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांनी ही लढाई सकारात्मक विचाराने लढली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी व्यक्त केली आहे.
पार्थ पवार म्हणाले आहेत की, नागरिकांनी प्रशासन आणि डॉक्टारांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सकारात्मक दृष्टीकोनातून करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण नकारात्मक विचारांना बाजूला ठेवूया आणि सकारात्मक विचाराने ही लढाई करुया!
Following doctors’ & administrators’ instructions alongwith a positive attitude has helped many people overcome the fight against corona. Be determined to not fall in to the dark abyss of negative thoughts.
Be positive!— Parth Pawar (@parthajitpawar) July 11, 2020