IMPIMP

११ जिल्ह्यात लेवल ३ चे निर्बंध, २५ जिल्ह्यात निर्बंधांत शिथिलता, काय आहेत निर्बंध? वाचा थोडक्यात

मुंबई : टास्क फोर्सच्या मिटींगनंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संचारबंदी बाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

कोणत्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल

परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुबई, जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक

मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम

कोणत्या जिल्ह्यात लेवल 3 चे निर्बंध कायम?

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, बीड, अहमदनगर

“केंद्राने जाहीर केलेल्या निधीचा आणि सध्याच्या पुराचा काहीही संबंध नाही” अजित पवारांचा पंचनामा

लेव्हल 3 चे नियम

  • सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
  • रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, संध्याकाळी ४ वाजेनंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
  • उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
  • सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५ वाजल्यापासून सकाळी ९ पर्यंत सुरू राहतील.
  • खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
  • कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
  • क्रीडा- सकाळी ५ वा.पासून सकाळी ९ वा./ सायं ६ वा. पासून सायं.९ पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
  • चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल.
  • सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
  • अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
  • बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५० टक्के बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
  • बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
  • कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
  • ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
  • जमावबंदी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व संचारबंदी संध्याकाळी पाचनंतर लागू राहील.
  • व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
  • सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
  • मालवाहतूक जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
  • खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
  • उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.

“पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही काय केलंत?” संतप्त चिपळूणकरांचा विचारला आदित्य ठाकरेंना जाब

उत्पादनाच्या अनुषंगाने…

  • अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन _ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
  • सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
  • राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
  • अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.

अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात यादिवशी जमा होणार १० हजारांची मदत, वडेट्टीवारांनी केली मोठी घोषणा

राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सच्या मिटींगमध्ये २५ जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्री जिथे कोयनेला पोहोचू शकत नाहीत, तिथे ते दिल्लीला काय पोचणार?”, मनसेकडून बोचरी टीका

तसेच, सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी सांगितलं. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

"नुकसान मोठं मात्र मिळणारी मदत तोकडी, त्यामुळे बहाणेबाजी बंद करून जबाबदारी घ्या!"

Next Article

पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’? अजित पवारांच्या हस्ते मिळणार हिरवा झेंडा

Related Posts
Total
0
Share