पुणे : पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचे मामाराव दाते मुद्रणालय आहे. येथे सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, सांस्कृतिक भवनातील काही वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार ही उघडकीस आला आहे. शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
मोठी बातमी: शिवसेना नेते आनंदराव अडसुळ ईडीच्या ताब्यात; तब्येत बिघडल्याने रुग्णालयाकडे रवाना
सांस्कृतिक भवनातील सुरक्षा रक्षक ओंकार गुरूड हे गुरुवार (ता.२३) रोजी पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे रात्रपाळीत सुरक्षा बजावत असताना सांस्कृतिक भवनातील हातगाडी, पाणीपुरी गाडी चोरून नेतांना त्या चोरांला पकडताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी ओंकार गुरूड यांनी केली आहे. “परवा सुरक्षा रक्षकांचे सुपरवायझर आले होते तेव्हा त्यांनी चौकशी केली. तोपर्यत आम्हाला काहीच माहित नव्हतं. या आगोदर अशी घटना घडली नव्हती. सबंधित घटनेची चौकशी करायला सांगितले आहे”.
Read Also :
- मित्राने मित्राचा शब्द पाळला, भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांच्या भावना
- मोठी बातमी: अखेर भाजप- मनसे एकत्र आले; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात फुटला युतीचा नारळ
- अडसुळ अडकले, आता हसन मुश्रीफांना कुणीच वाचवू शकणार नाही; किरीट सोमय्याचा दावा
- राष्ट्रवादीच्या नेत्याची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा
- आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा ‘या’ दिवशी; राजेश टोपेंनी सांगितली तारीख