सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात 22 जुलैपासून आठ दिवसांचा लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील.
सांगलीत बुधवार 22 जुलै रात्री 10 वाजल्यापासून गुरुवार 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी असेल. सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला. सांगलीतील गर्दी कमी न झाल्यास लॉकडाऊन करणार, असा इशारा आधीच जयंत पाटील यांनी दिला होता.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजीत कदम, विद्यमान आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.