पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. लवकरच याची सविस्तर नियमावली जारी केली जाणार आहे.
पुण्यात दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊन असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कडक लॉकडाऊन असेल. सोमवारी (13 जुलै) मध्यरात्रीपासून ते 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन असेल. लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी काढणार आहेत. दूध, औषधे आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील”,अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
दरम्यान, कोरोनाचा धोका टळलेला नाही. तरीही पुण्यात काही नागरिक कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे अनेक नागरिक मास्क न वापरता खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास प्रशासनाला आणखी कडक भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चार दिवसापूर्वी दिला होता.