मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात गेल्या आठवड्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही आणि म्हणे भावी खासदार; आमदार गोरंट्यालांची खोतकरांवर टीका
कार्यक्रमांसाठी एकत्र येणाऱ्या लोकांची संख्या आता ५० करण्यात आली आहे. ५०च्या वर जर लोकं एखाद्या कार्यक्रमाला जमा झाले तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनात जवळपास २५ आमदार आणि २ मंत्री कोरोनाबाधित झाले होते.
आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. राज्यात जर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास लवकरच राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल, असं अजित पवार म्हणाले.
मागील आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील अनेक राज्यात रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आलं आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा करोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. या सर्व गोष्टी टाळण्याची नितांत गरज असं आहे असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात नवा वाद, बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव गायब
माझे सध्याचे कार्यक्रम देखील मी नियोजित वेळेच्या आधीच घेत आहे. त्यामुळे गर्दी देखील जास्त होत नाही. जर मीच नियम पाळले नाही तर कार्यकर्त्यांना देखील काय सांगायचं आणि ते ऐकणार तरी काय ? अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून जास्तीत जास्त काळजी मी घेत आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय
- याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही आणि म्हणे भावी खासदार; आमदार गोरंट्यालांची खोतकरांवर टीका
- शिवसैनिक म्हणून आम्हाला जगू द्या, दुसरी कोणतीही मागणी नाही; राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांमुळे आढळराव हतबल?
- १३ महापालिकांत होणार ओबीसी आरक्षणाविना निवडणुका; निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना मोठा धक्का
- मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने