देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे पावले उचलले जात आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांना देखील यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता मुंबईचे पालकमंत्री आणि ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
This is to inform that I’ve tested positive for #COVID19. I’m currently asymtomatic and isolating myself.
I request all those who have come in close contact with me to get themselves tested.
I will continue to work from home to serve the people of my state. 🙏🏻
— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) July 20, 2020
अस्लम शेख यांनी ट्विट करत माहिती दिली की, मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला आयसोलेट करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी. मी घरातून काम करत माझ्या राज्यातील लोकांची सेवा करत राहील.
अस्लम शेख हे 2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले आहेत. मुंबईतील मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, सध्या ते ठाकरे सरकारमध्ये वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत.