नवी मुंबई : राज्यात ओढावलेल्या पूरग्रस्तांना १ कोटी रुपये द्या. तसेच मोडकळीस आलेल्या इमारती व डोंगराळ भागातील रहिवाशांच्या घरांची व्यवस्था करा, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या यांनी केली आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहोचेल असेही त्यांनी सूचित केले आहे.
हे पण वाचा: ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध विषयांसंदर्भात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतंच भेट घेतली. राज्यात ओढवलेल्या पूरग्रस्तांना महापालिकेमार्फत १ कोटी मदत देण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी केली. महापालिका आयुक्त यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. लवकरच पूरग्रस्तांना ही मदत पोहचणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
हे पण वाचा: नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
सीवूड्स से-५० येथे शासकीय हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारणेकरिता भूखंड हस्तांतरित करणे, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचे नामकरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे करणे, मोडकळीस आलेल्या इमारती आणि डोंगराळ भागातील रहिवाशांच्या घरांची व्यवस्था करणे, आमदार निधीतून शुटींग रेंज प्रशिक्षण केंद्र, कुस्ती आखाडा उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
हे पण वाचा: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी दिलले्या माहितीनुसार, जोरदार अतिवृष्टीमुळे कोकणाला अक्षरश: झोडपून काढले आहे. या पावसामुळे कोकणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सततच्या पावासामुळे दरड कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारसहित विविध स्थानिक स्वराज्य संस्थाकडूनही मदतीचा ओघ सुरु आहे.
Read Also :
- थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी