मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची, राज्य सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर, राज्यात ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, यावरून आजच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली.
सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; भाजपच्या तब्बल १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन
ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारने देण्यासाठी आज विधानसभेत ठराव मांडण्यात आला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला. बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. त्यावर हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव, म्हणजे ठाकरे सरकारचं वेळकाढूपणाचं धोरण”- देवेंद्र फडणवीस
तसेच, “भुजबळ हे विधानसभेत खोटं बोलत आहेत. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. यातून काही साध्य होणार नाही. भुजबळ मोजकेच मुद्दे वाचत आहेत. ठराव मांडण्यासाठी ७ दिवसांची नोटीस देणं अपेक्षित, सभागृहाचे नियम धुळीस मिळवले जात आहेत,” अशा शब्दांत त्यांनी या ठरावाची चिरफाड केली.
केंद्र सरकार एम्पिरिकल डाटा देत नाही; विधानसभेत ठरावावरून फडणवीस-भुजबळ आमने-सामने
यावर भुजबळ यांनी, “राज्य मागासवर्गीय आयोगाला केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळालेला नाही. २०१७ ला केस सुरु झाली, पण २०१९ पर्यंत फडणवीस सरकारनं काहीच केलं नाही,” असा आरोप त्यांनी केला. या सगळ्या खडाजंगी दरम्यान अध्यक्षांनी प्रस्ताव मत मोजणीसाठी ठेवला. यावेळी, विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी विरोधी पक्ष नेत्यांनी या डेटाला आमचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं.
Read Also :
- विधानसभेत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत, उपमुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
- ED च्या कचाट्यात सापडलो म्हणून पळून जाणार नाही; प्रताप सरनाईक पहिल्यांदाच आले समोर
- ठाकरे सरकारकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम, देवेंद्र फडणवीस आक्रमक
- नितीन गडकरींच्याही कारखान्यांची ईडी चौकशी होणार? केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी केली आहे मागणी
- सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं; MPSC वाल्या विद्यार्थ्यांचे तीन तेरा वाजले – फडणवीस आक्रमक