अकोला : शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, “भाजपला सत्तेतुन बाहेर ठेवणे हाच महाविकास आघाडीचा उद्देश असून, त्यासाठी आम्ही घटक पक्ष राज्यात आगामी सर्व निवडणुका सोबत लढणार आहे,” असे सांगितले.
शिवसेनेत घुसमट? नारायण राणेंच्या गौप्यस्फोटवर, एकनाथ शिंदे म्हणतात…
“राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्र येऊन स्थापित केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. आमचा एकच उद्देश आहे, भाजपला सत्तेबाहेर ठेवणे. त्यामुळे आगामी सगळ्या निवडणुकांत राज्यात, महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही याआधीच यासंदर्भातली भूमिका स्पष्ट केली आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी जोराने तयारी करत असलयाचे यातून स्पष्ट होते आहे.
आमदार निलेश लंकेंवर केलेल्या गंभीर आरोपावर सुप्रिया सुळे म्हणातात…
दरम्यान, यावेळी महिला बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी, “केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली असून, “रावसाहेब दानवे यांनी केलेली टीका, हा तर राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
“उपमुख्यमंत्री अजित पवार हवी तशी साथ देत नाहीत,” यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
यावेळी, “बालसंगोपन निधी अनुदानात कित्येक वर्षांपासून वाढ झाली नव्हती. त्या निधीच्या माध्यमातून पूर्वी ४५० रु. मिळायचे. आमच्या सरकारने त्यात वाढ करून ते १ हजार १२५ रु. केले. आता परत अनुदानात वाढ करून २ हजार ५०० रुपये करण्याचा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पाठवला. मात्र, त्यांच्याकडून आम्हाला हवी तशी साथ मिळत नाही.” असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Read Also :
- परमबीर सिंग-वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ लाख वसूल केले, बारमालकाचे गंभीर आरोप
- “एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, त्यांना आमच्यात घेऊ”; राणेंचा मोठा गौप्यस्फोट
- राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला, भाजपकडून पहिल्यांदाच दिली गेली प्रतिक्रिया
- तर मात्र आपल्याला कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल”, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
- उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट