सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये ते कोरोनाने लोकांचे जगणेच अशक्य केले आहे. पुणे जिल्ह्यात दिवसाअखेर रोज ३०० ते ४०० रुग्णांची नोंद होत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्या सध्यस्थितीला ८ हजाराहून अधिक रुग्ण आहेत. शहरातील आरोग्य व्यवस्थापनाची क्षमता पाहता आता कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडू लागले आहेत. तसेच, कोरोना सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी, डॉक्टर यांच्यावरही मोठा ताण आहे. परिणामी, रुग्णांची सेवा सुश्रृषा आणि सुविधांवरुन समाजात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तसेच साथ नियंत्रण कायद्याद्वारे शहरातील डॉक्टर्स-हॉस्पिटल यांनी बजावायची जबाबदारी याबाबत महापालिका प्रशासन व शहरातील विविध डॉक्टर्स संघटना यांचे प्रतिनिधी यांच्याशी आमदार महेश लांडगे यांनी गुगल मीटद्वारे चर्चा केली.