साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरी मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मूळगावी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले
आमदार महेशदादा लांडगे यांनी सांगितले कि, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित अण्णाभाऊ साठे सृष्टी मुक्कामपोस्ट वाटेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जाऊन खूप प्रेरणा मिळाली. अश्या थोर व्यक्तिमत्वाच्या जन्मशताब्दीच्या निमित्याने हा जुळून आलेला क्षण आयुष्यात खूप मोलाचा आहे.”
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घरी जाऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रवासावर आधारित तैलचित्र व सृष्टी पाहून मनाला प्रेरणा मिळाली., असेही आमदार महेशदादा लांडगे यांनी सांगितले.