काही दिवसांपुर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केली घडली होती. या प्रकरणात उमेश जाधव या आरोपीला 9 जुलैला अटक करण्यात आले होते. त्यानंतर काल विशाल नावाच्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra: Police arrested Vishal Ashok, the main accused in the incident where premises of Dr BR Ambedkar's house 'Rajgruha' in Mumbai was vandalised by unidentified persons on 7th July. Another accused Umesh Jadhav was arrested on 9th July.
— ANI (@ANI) July 22, 2020
काही अज्ञातांनी राजगृहाच्या घराच्या काचांवर दगडफेक केली होती व राजगृहातील कुंड्यांचेही नुकसान केले होते. या घटनेनंतर सर्वच स्तरातून त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासात कारवाई करण्यास सुरूवात केली होती व त्वरित दोन दिवसांनी एका आरोपीला अटक करण्यात आले होते.