पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्याच नेतृत्वात लढली जाणार आहे,’ असं सांगत त्यांनी, ‘पुण्यातील काही भाजप नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या वक्तव्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
युती झाल्यास पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच का? दानवे म्हणतात…
याबाबत आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, ‘मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. आम्ही भाजपच्या अनेक नगरसेवकांना संधी दिली आहे. विकासाचं व्हिजन समोर ठेवूनच आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये कामं केली. परंतु आता भाजपतले जे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत, त्यांना मी सांगतो, ज्यांना यायचं आहे त्यांनी अपात्र झालं नाही पाहिजे. ते अपात्र ठरले तर ६ वर्ष निवडणूक लढू शकणार नाहीत.’
‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार म्हणतात, ‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं…’
तसेच, मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद इथे केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना त्यांनी, ‘आम्ही आजपर्यंत एकत्र चांगलं काम केलं आहे. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही. ते राज्य प्रमुख आहेत हवं ते बोलू शकतात. त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय? हे मला माहिती नाही. त्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, राज्य कसं चालवायचं, जनतेच्या समस्या काय, यावरच चर्चा होतात,’ अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे.
ईडी-सीबीआय नंतर इन्कम टॅक्स विभागाने ठोठावले देशमुखांच्या घराचे दरवाजे
यावेळी, ‘विसर्जनाच्या दिवशी पुण्यात सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा व रेस्टॉरंट-हॉटेल सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, रेस्टॉरंट-हॉटेल वगळता इतर सर्व दुकानं रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहेत. या निर्बंधाबाबत जिल्ह्यातल्या सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींनी मिळून हा निर्णय घेतला आहे. तसेच, हे निर्बंध पिंपरी चिंचवडसह कॅन्टोनमेंट क्षेत्रालाही राहणार आहेत,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- ब्रेकिंग! वाझेचा खुलासा, पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी मागितले २ कोटी
- गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात काय चालू, काय बंद?
- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यासाठी विविध मोठ्या घोषणा
- संजय राऊत-चंद्रकांत पाटील यांच्यात रंगले ‘विनोदी’ शाब्दिक युद्ध
- ‘मोदींच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही!’