मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. पुढील 3 दिवसात ही सुनावणी पुर्ण होणार आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. रवींद्र भट यांच्या त्रिसदस्यीय न्यायपीठासमोर 27 जुलैपासून दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होणार आहे.
याआधी 15 जुलैला झालेल्या सुनावणीमध्ये णताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिली नाही. अंतिम सुनावणीत दीड दिवस याचिकाकर्त्यांना तर दीड दिवस दुसऱ्या बाजूला युक्तिवादासाठी मिळणार आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य तसेच मराठा आरक्षण लढ्यातील विविध नेत्यांसोबत बैठक पार पडली होती.