शॉर्ट व्हिडीओ अॅप टीक-टॉकवर सध्या अनेक देशांनी निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील टीक-टॉकवर बंदी घालणार असल्याचे म्हटले होते. आता अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्ट बाईट डान्सकडून टिक-टॉक खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मायक्रोसॉफ्टने याविषयी माहिती देताना सांगितले की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर टीक-टॉकच्या अमेरिकन ऑपरेशन्सला खरेदी करण्याविषयी चर्चा सुरू आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली.
ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेची चिंता व्यक्त करत अमेरिकेत टीक-टॉकवर बंदी घालण्याची धमकी दिली होती. त्याआधी अमेरिकेचे सचिव माइक पॉम्पिओ यांनी टीक-टॉकवर मोठी कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले होते.
मायक्रोसॉफ्ट टीक-टॉकचे अमेरिकन ऑपरेशन्स खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता ट्रम्प यांच्याद्वारे अॅपवर बंदी घालण्याची चर्चा थोडीफार मागे पडली आहे. दरम्यान, भारताने देखील या अॅपवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून बंदी घातलेली आ