पुणे : आगामी सहा महिन्यानंतर राज्यात प्रमुख समजल्या जाणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्याकरिता आतापासूनच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेने औरंगाबाद, मुंबई तर राष्ट्रवादीने पुणे महानगर पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्याची ठरवले आहे.
पुढचा मुख्यमंत्री काॅंग्रेसचाच असणार! नाना पटोलेंच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून लोकपयोगी कामांच्या उदघाट्नचे अनेक कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. मात्र आता सर्वच राजकीय पक्षांसाठी आणि त्यांच्या ईच्छुकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांची प्रभाग रचना तयार करण्याचे काम सध्या सुरु असताना राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे पुन्हा एकदा रद्द झाल्यात जमा आहे.
आता तुमचा भ्रष्टाचार काढला तर गुन्हेगार करायला निघाला का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
नगरसेवक आणि इच्छुकांकडून सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना प्रभाग रद्द झाल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे. नव्याने प्रभाग रचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षण टाकले जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरूंगात ठेवले! आम्ही घाबरणारे नाहीत; देवेंद्र फडणवीस
स्थानिक संस्थांमध्ये ओबीसींच्या आरक्षणावरून मागील काही दिवसांमध्ये राजकारण चांगलेच पेटले होते. स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे आरक्षण कायम असावे, अशी भूमिका राज्यातील सर्वच पक्षाने घेतली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ठराव प्रेरित करून मंजूर करून घेतला आहे. त्यास राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. या कायद्यात निवडणूक घेण्याबाबत व प्रभागरचना करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले आहेत त्यानुसार ही प्रभाग रचना रद्द झाली आहे.
Read also:
- ” खासदार सुजय हा अत्यंत नम्र अन् विनयशील “; खासदार सुजय विखेंबद्दल बाळा नांदगावकरांचे आपुलकीचे बोल
- लांबे यांच्यासोबत फडणवीसांचा फोटो व्हायरल! मलिकांवर केलेल्या आरोपांबद्दल सना मलिकने फडणवीसांची हवाच काढली;
- त्यामुळेच उगाचच दाऊद दाऊद करून..; फडणवीसांनी फोडलेल्या दुसऱ्या बॉम्बवर दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया
- चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डावर नियुक्त केलीत! देवेंद्र फडणवीसांनी सादर केला दुसरा पेन ड्राईव्ह
- विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी फोडला दुसरा राजकीय बॉम्ब! राज्यात एकच खळबळ