औरंगाबाद : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमने भाजपकडून कोटी रूपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा रंगली होती. यावर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
भाजपने आम्हाला एक हजार कोटी नव्हे तर दहा हजार कोटी दिले होते. चंद्रकांत खैर यांना सध्या विश्रांती हवी होती म्हणून शिवसेना- भाजपने मला विजयी करण्यासाठी दहा हजार कोटी रूपये दिले होते. खुद्द खैरे हे पैसे आणून दिले होते. मात्र त्यातील दोन हजार त्यांच्याकडे शिल्लक असून ते कधी परत करणार याची वाट पाहतोय, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंना लगावला आहे.
“बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
ज्या ज्यावेळी चंद्रकांत खैरे बोलतात. त्यावेळी आम्ही फक्त त्यांच्याकडे करमणुक म्हणून बघतो. तसेच ते औरंगाबादसाठी करमणुक फॅक्टर झाले आहेत. त्यामुळे मी कधीही त्यांना महत्वाचं समजलं नाही. एक हजार कोटी रूपये आरोप करणाऱ्या खैरेंना इडीला पत्र लिहून भाजपकडे हे पैसे कुठुन आले होते याची चौकशी करण्याची मागणी करावी, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे वचिंतने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर माझे ते शब्द मागे घेतो, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. मात्र एमआयएमवर केलेल्या आरोपांवर ते अजूनही ठाम आहेत.
Read also:
- न्यायालयीन कोठडीत असलेले नवाब मलिक आणि देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?
- “गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
- लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
- “यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या