मुंबई : मुस्लिम आरक्षणावरून आता एमआयएम चांगलीच फ्रंटफूटवर आलेली दिसत आहे. मुल्सिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरून आज एमआयएमने मोठी रॅली काढली आहे. एमआयएमकडून आज औरंगाबाद-मुंबई रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
“मनसे गळकं घर”; औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत..!
सदरील रॅलीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. परवानगी नसतानांही एमआयएमने रॅली काढली आहे. कार्यकर्त्यांच्या ३०० गाड्यांचा ताफा घेऊन एमआयएमने थेट दिल्लीत धडक मारली आहे. आज संध्याकाळी मुंबईत एमआयएमचे संस्थापक आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची सभा आहे. या सभेलाही पोलिसांची अद्याप परवानगी नाही आहे. तरीही एमआयएम सभा घेण्यावर ठाम आहे. असदुद्दीन ओवेसींच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या चांदिवली भागात आज रॅली होणार आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला जाग यावी यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे असं बोललं जातं आहे.
विधानपरिषद निवडणुकीत पक्ष तटस्थ, तरीही बसपाचे दोन नगरसेवक मतदानाला! कोणासाठी?
यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. सदरील रॅलीसाठी औरंगाबादमधून ३०० गाड्यांचा ताफा सकाळी सकाळी मुंबईच्या दिशेने निघाला आहे. या रॅलीचं नेतृत्व एमएम खासदार इम्तियाज जलील करत आहेत. याबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला.
Read Also :
- …तर भाजप आम्हाला फार दुर नाही; राष्ट्रवादीचा शिवसेनेला गर्भित इशारा
- कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार?; माजी आमदार भाजपच्या वाटेवर?
- अनिल परबांकडून ‘त्या’ दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..!
- विधान परिषदेत कोणाची बाजी? अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजप आणि काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
- तुम्ही शिवसेनेचं बोट धरुनच मोठे झालात, हे विसरु नका – शंभुराज देसाई