मुंबई : गेल्या काही दिवसात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांना उत्तर अजित पवार यांनी ‘कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही’, असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी हे सरकार पाडणारा लाल अजित पवारच आहेत, असे वक्तव्य केले आहे.
अजित पवार म्हणतात की कोण लाल आहे जो हे सरकार पाडून दाखवेल, तर मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत, असा खोचक टोला रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
दरम्यान, राज्यातील महायुतीचे नेते मराठा आरक्षणाच्या मुद्याबाबत पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे रामदास आठवलेंनी सांगितले. येत्या 20 तारखेनंतर मोदींची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
Read Also :
- मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत महायुतीचे नेतेही पंतप्रधान मोदींना भेटणार
- ‘चंद्रकांत पाटलांना उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यावर बघू’
- ‘भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक, पण…’
- ‘शिवसेनेला वचन पळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’
- वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनीही केले ‘हे’ आवाहन