नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून चार दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गडात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर आहे. चार दिवसांत शरद पवार नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत.
ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभमिवर उद्या पवार यांची नागपूरातील संघटनात्मक बैठक आणि कार्यकर्ता मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना ‘राष्ट्रवादीचं विदर्भातील एकमेव दुकानं बंद करु’ असं म्हटलं होतं, त्या पार्श्वभुमिवर शरद पवार यांचा उद्यापासून होणारा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीला आणखी बळ मिळेल, असा विश्वास स्थानिक नेते व्यक्त करत आहेत.
आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही – आशिष शेलारांचा इशारा
नाना पटोले म्हणाले होते, राष्ट्रवादीचे सगळे महान नेते असून पंढरपूरमध्ये हरले. आज राष्ट्रवादीचे तिकीट घेवून त्यांचे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलडाण्यातील दुकान बंद व्हायला वेळ लागतो किती. एकच तर दुकान आहे बुलडाण्यामध्ये, ते विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दौरा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर पवार नाना पटोलेंच्या वक्तव्याचा कसा समाचार घेतात, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- “बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, जनतेच्या नशिबात आघाडीची सजा”
- ईडीकडून भाजप नेत्याच्या मेव्हण्यावर कारवाई; चौकशीनंतर केली अटक
- केंद्र सरकारने झाकीर नाईकचा फास आवळला, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षासाठी बंदी
- “अनिल बोंडेंनीच अमरावतीतील दंगल घडवली”, नवाब मलिक यांचा दावा
- समीर वानखेडे पुन्हा रडारवर; नवाब मलिकांनी उघड केलं ‘ते’ व्हॉट्सअॅप चॅट