पुणे : दिव्यशक्तीचा चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेद्र कृष्ण महाराज सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत. यातच त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून जोरदार टिका केली जात आहे. तर धीरेंद्र महाराज जिथे असेल तिथे ठोकून काढा, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे. अकोल्यात बोलतांना त्यांनी धीरेंद्र महाराज यांना इशारा दिला आहे.
“तर त्यांनी हा खटला लवकर दाखल करावा,” इम्तियाज जलील यांचे सुभाष देसाईंवर धक्कादायक आरोप
संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी खुप मारत होत्या. त्यामुळेच त्यांना प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळाली. तसेच त्यांना जर चांगली पत्नी मिळाली असती तर ते पत्नीच्याच प्रेमात गुरफूटून गेले असते. त्यांना मारहाण करणारी पत्नी मिळाली असं आक्षेपार्ह वक्तव्य धीरेंद्र महाराज यांनी केलं आहे. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर कडाडून टिका होत आहे.
“एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल
धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे, अवघे कोलियाचे वर्म अंडी, घातलिया, तोंडी खीळ पडे. अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल तर, मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी, हा जिथे दिसेल तिथे याला ठोकून काढा. असा थेट इशाराचा मिटकरी यांनी दिला आहे.
Read also
- ”मुंबई महापालिकेवर आमचाच झेंडा, 2024 ला पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…” बड्या नेत्याचं भाकित
- ऊर्फी जावेदवर आता टिका नको, तिचं कौतुक करा, चित्रा वाघ यांनी केलं ऊर्फीचं कौतुक
- कसबा पेठ पोटनिवडणुक मनसेने लढवावीच,; मनसेच्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे मागणी
- सत्यजीत तांबेंचा भाजप कनेक्शन, थेट भाजपच्या कार्यालयात जाऊन घेतली जिल्हाध्यक्षांची भेट
- “पोटनिवडणुकांमध्ये मतं कमी पडली तर तिकीट कापलं म्हणून समजा”, भाजपच्या माजी खासदाराचा नगरसेवकांना इशारा