अहमदनगर – मागील दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त राजकारण चांगलेच पेटले होते. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि भारतीय जनता पक्षाचे नामदार बबनरावजी पाचपुते यांच्या समर्थकांमध्ये थेट लढत या निवडणुकीत झाली.
शुक्रवारी १४ जानेवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडली. काल रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी सुरु होती. नागवडे यांच्या किसान क्रांती मंडळ आघाडीने पाचपुते समर्थकांना क्लिन स्विप करत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
आता एसटीमध्ये खासगी, सेवानिवृत्त चालक घेतले जाणार; व्यवस्थापकीय संचालकांची मोठी घोषणा
आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना देखील पराभवाचा जबर धक्का बसला आहे. सर्वपक्षीय विरोधकांना पुरून उरून राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
पॅलेट पेपरवर यंदा निवडणूक झाल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेस उशीर झाला. शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व २१ जागांवर राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली किसान क्रांती पॅनलला विजय मिळाला आहे.
विरोधी पाचपुते गटाचे प्रमुख केशव मगर, अण्णासाहेब शेलार, प्रतिभा बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सत्ताधारी मंडळाचे प्रमुख राजेंद्र नागवडे हे दोन मतदारसंघातून जिंकले.सेवा संस्था मतदारसंघात ४१ पैकी २५ मते मिळवत राजेंद्र नागवडे यांनी बाळासाहेब नाहाटा यांचा नऊ मतांनी पराभव केला. नागवडे या मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवतील अशी अपेक्षा असताना नाहाटा यांनी देखील नागवडेंना कडवी झुंझ दिली.
Read also:
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
- दुकानांवरील मराठी पाट्यांना केवळ भाजप समर्थकांचा विरोध; मंत्री नवाब मलिकांचा आरोप
- राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब; काय घडलं नेमकं…
- तुम्ही कितीही करा हल्ला, पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला – महापौर किशोरी पेडणेकर
- आयुक्त इकबाल सिंह, यशवंत जाधव यांच्या रूपात महापालिकेत सचिन वाझे; आमदार अमित साटमांचा आरोप