मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. यामध्ये भाजपच्या 9 तर शिंदे गटातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदार किंवा अपक्ष आमदारांना संधी दिलेली नाही. या वरून अपक्ष आमदार बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा हा पहिल्या टप्पयातील विस्तार आहे. त्यामुळे आमच्या नाराजीचा काही प्रश्न येत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. या सोबतच उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवले गेले आणि जो पहिला आला त्याला शेवटी बसवले जात आहे. नाराजी नाही, राजकारणात कमी जास्त हा बदल चालु असते, आम्ही समजदार आहे. आमची कोणतीही नाराजी नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मंत्रिपदासाठी आम्ही एकनाथ शिंदे सोबत गेलो असं आमचं मत बिलकुल नाही. दिया तो भला, नही दिया तो उससे ज्यादा भला. मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले आहे की दिलेला शब्द पळणार आहे. मी दिलेला शब्द मोडणार नाही. मला मुख्यमंत्र्यांवर आत्मविश्वास आहे, असं बच्चू कडू म्हणाले. याबरोबरच शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले पवारांसारखं राजकारण शिंदेंनी करावं असा नियम नाही. पवारांसारख राजकारण मुख्यमंत्री शिंदेंनी करून कसं चालेल. प्रत्येकाचं वेगळं पद्धत असते, त्यापद्धतीने सामोरे जातात.
“भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”
भाजप आणि शिंदे गटात मिळुन अपक्ष व मित्रपक्ष आमदारांची संख्या 30 आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला संधी दिली गेली नसल्याने आता अपक्ष आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारात आता कोणत्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Read also
- “फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाची ओझी शिंदे गटाने ठेवलीय”
- मुतायचं लय वांदे झालेय साहेब….. असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाठ यांचं भन्नाट उत्तर
- फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू
- “ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
- “शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”