पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा सोशल मिडियात डंका वाजू लागलायं. कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर असलेल्या महेश लांडगे यांच्या फेसबुक फेजला 1 लाख 90 हजारांपेक्षा अधिक नागरिक फॉलो करत आहेत. तर 1 लाख 48 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पेजला लाईक केले आहे. त्यामुळे, फेसबुककडून लांडगे यांच्या पेजचे आज (मंगळवारी) ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाले आहे. शहरासह राज्यातील नागरिकांच्या पसंतीच्या जोरावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या सोशल मीडियात “महेश लांडगे”चीच धूम आहे.
आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील – संजय राऊतांचा इशारा
महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजपचे तरुण, तडफदार आमदार आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे. ते पैलवान आहेत. गतवेळी मोदी लाटेत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावार जोरदार विजय मिळविला होता. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे, भाजपच नव्हे तर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह अन्य पक्षातील नेतेही आमदार महेश लांडगे यांचे चाहते असल्याची चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे.
देवेंद्र फडणवीसजी, आता माफी मागा; ‘त्या’ विषयावरून नवाब मलिक कडाडले
महेश लांडगे यांच्या फेसबुक पेजला ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाल्याने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात मोठा चाहता वर्ग असल्याचे दिसून येते. कारण पिंपरी चिंचवड शहरात भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक असे एकूण तीन आमदार आहेत. त्यामध्ये दोन आमदार भाजपचे आणि राष्ट्रवादीचा. परंतू, अद्याप यापैकी एकाही आमदाराला सोशल मिडियावर एवढी मोठी मजल मारता आली नाही. लांडगे हे शहरातील विकास कामांसह सोशल मिडियावरही नेहमीच अक्टिव्ह असतात. त्यामुळे, त्यांच्या फेसबुक पेजला फेसबुक फेजला 1 लाख 90 हजारांपेक्षा अधिक नागरिक फॉलो करत आहेत. तर 1 लाख 48 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी पेजला लाईक केले असून पिंपरी चिंचवडकरांनी साथीमुळे पेजला आज ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
धन्यवाद पिंपरी चिंचवडकरांनो
पिंपरी चिंचवड आणि पुणेच नव्हे तर राज्यातील जनतेचे माझ्यावर किती प्रेम आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरतरं जनतेच्या साथीमुळेच आज फेसबुक पेजला ब्ल्यू-टिक वेरिफिकेशन झाले आहे. जनतेने जे माझ्यावर प्रेम दाखवले, त्याने मी धन्य झालो. पिंपरी चिंचवडकरांच कौतूक शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे. जनतेच्या हितासाठी आणि विकास कामांसाठी लागेल ती पायरी मी चढेन, तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या, अशा भावना आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
Read Also :
- मोठा धक्का: अखेर अजित पवारांची १ हजार कोटींची मालमत्ता आयकर विभागाने केली जप्त
- दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा ऐतिहासिक विजय; कलाबेन डेलकरांचा भगवा फडकला!
- कोणताही शत्रू शुद्र नसतो, भाजप कार्यकर्त्यांच्या धमन्यात संस्कार – पंकजा मुंडे
- फटाके जरूर फोडा पण, धूर काढू नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
- दादर-हवेलीमध्ये शिवसेनेची ऐतिहासिक विजयाकडे कूच; देगलूरमध्ये जितेश अंतापूरकर आघाडीवर