सध्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातल्या त्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये ते कोरोनाने लोकांचे जगणेच अशक्य केले आहे. पुणे जिल्ह्यात दिवसाअखेर रोज ३०० ते ४०० रुग्णांची नोंद होत आहे. अशातच आता पुण्यातील अनेक राजकीय नेत्यांदेखील कोरोनाने आपल्या जाळयात पकडले आहे. पुण्याचे महापौर उपमहापौर ते नगरसेवक पालिका कर्मचारी याना देखील कोरोनाने सोडले नाही. तसेच पिंपरी चिंचवड शहरात देखील करूनच प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे
भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली होती २९ जून रोजी त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र ५ जुलै रोजी आमदार महेश लांडगे यांना आदित्य बिर्ला रुग्णालयातून परिवारासह डिस्चार्ज देण्यात आला
आमदार महेश लांडगे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वतः पुढे सरसावताना दिसत आहे त्यांनी आता जनता कर्फ्यू या मोहिमेची सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रोगप्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील लोकांना दर गुरुवार आणि रविवार सकाळी ७ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.
“पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता रोगप्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी दर गुरुवार व रविवार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. हि नम्र विनंती.” अशी विनंतीत्यांनी नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
दरम्यान, गुरुपौर्णिमेच्या निम्मिताने मास्क लावलेला आपला फोटो सोशल मीडिया वर शेअर करा असे सांगितले होते. त्यांनी स्वतः एक फोटो शेअर करत या मोहिमेची सुरुवात केलीहोती .