मुंबई : कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ असं नारायण राणे म्हणाले.
किरीट सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले.
मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई नको, असं म्हणणं योग्य नाही, ही चुकीची लोकशाही होणार. म्हणून लोकशाहीत फुल होमवर्कसह कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापे मारले आहे.
ईडीच्या या कारवाईचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी बेनामी मालमत्ता जमवली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ईडी सबळ पुरावे आणि माहिती असल्याशिवाय कारवाई करत नाही, असं सांगतानाच शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत आहे, अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
Read Also :
‘सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये’ राणेंचा ठाकरेंवर निशाणा
..म्हणून विश्रांतीसाठी सोनिया आणि राहुल गांधी ‘या’ शहरात दाखल
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात ‘टास्क फोर्स’ची स्थापना
मुंबई महापालिका निवडणूक: भाजप मनसेसोबत जाणार? फडणवीस म्हणाले….
किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईचं स्वागत करत साधला शिवसेनेवर निशाणा, म्हणाले…