मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. भाजपच्या 9 तर शिंदे गटातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळात अपक्ष आमदार आणि महिला आमदारांचा समावेश नसल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधीपक्ष जोरदार टीका करताना दिसत आहे. तर अनेक नेत्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागली नसल्याने ते एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचं ही बोलल जात आहे. काल हा सगळा गोंधळ सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना एका कार्यकर्त्याने फोन केला या फोन कॉलचे रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे.
“भाजपमध्ये जाताच बाकीच्या नेत्यांना गंगेमध्ये धुऊन पवित्र केलं”
आमदार संजय शिरसाठ यांना एका कार्यकर्त्यांचा अचानक फोन आला. त्या कार्यकर्त्यांने संजय शिरसाठ यांना मुतारी बांधा असं सांगितलं. या बरोबरच मुतायचं लय वांदे होतय अशी तक्रार देखील केली. त्यावर संजय शिरसाट यांनी माझ्याकडे येऊन कर अशा शब्दात उत्तर दिले आहे याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार वायरल होत आहे. हा कार्यकर्ता संजय शिरसाठ यांच्या मतदार संघातला असल्याचं बोललं जात आहे. तसेच मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आधिक गोंदळ सुरू असल्याने आमचं चाललय काय तू विचारतोयस काय, माझ्याकडे येऊन कर असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
“ज्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, त्यांना “अच्छे दिवस” आले असल्याचं समजावं”
या आधीही बंडखोर आमदार शहाजी पाटील यांचा कार्यकर्त्यांसोबतचा फोन रेकॉर्डिंग प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. या मध्ये आमदार शहाजी पाटील यांनी मी सध्या गुहावाटीत आहे, काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे..असं म्हटलं होतं. ही फोन क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
शिंदे सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी, अन् राष्ट्रवादीचा नव्या मंत्र्यांबाबत ‘पोस्टर वार’
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा, रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, दिपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, तानाजी सावंत, संजय राठोड, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील दादा भुसे, विजय कुमार गावित यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
Read also
- फडणवीसांचा पहिलाच पुणे दौरा; अन् राष्ट्रवादीला खिंडार, भाजपचं ‘लोटस कमळ ऑपरेशन’ सुरू
- “ED ची अतिरिक्त तुकडी तातडीने महाराष्ट्रातून बिहारला रवाना”
- “शिंदेंसोबत ४०-५० आमदार गेले, त्या सर्वांनाच मंत्री व्हायचे, पण…;”
- शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 15 महिला आमदार; पुढच्या टप्प्यात कुणाला मिळणार संधी?
- पाटलांची मंत्रीपदासाठी वर्णी लागल्याने, बावनकुळेंकडे मोठी जबाबदारी, शेलारांकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद?