मावळ: महाराष्ट्रातील लोकप्रिय व मावळचे कार्यतत्पर आमदार सुनिल शेळके यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खडकवासला, कर्जत व चिंचवड मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती इ. निवडणुकांच्या दृष्टीनेही पूर्वतयारी करावी. पुढील विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा हे उद्दीष्ट समोर ठेवून आपण ही जबाबदारी पार पाडावी असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
हे पण वाचा, देहूनगरीत राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळकेंची जादू; पहिल्याच निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसचा सुपडा-साफ
सन २०१९ च्या महत्वपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये शेळके हे विरोधकांवर मात करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. तसेच ते मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत विकास कामांवर देखील लक्ष ठेवून कार्यरत असल्याने तरुणांचे व सर्वसामान्य नागरिकांचे ते चाहते आहेत. याकरिता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या सूचनेनुसार पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून खडकवासला, कर्जत व चिंचवड या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी शेळके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आमदार सुनिल शेळके यांची काम करण्याची पद्धत व निवडणुकीतील प्रभावी व्युव्हरचना तसेच नुकत्याच झालेल्या देहू नगरपंचायत निवडणुकीत आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे आमदार शेळके यांच्यावर पक्षाने ही जबाबदारी सोपविली आहे.
हे पण वाचा, विरोधकांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी किरीट सोमय्याला चुकीची महिती दिली – आमदार सुनिल शेळके
खडकवासला, कर्जत व चिंचवड या विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या दृष्टीने या मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करणे, पक्षातील गटतट संपविणे व मतदार संघाचे निरीक्षण करून पक्षास कळविणे ही जबाबदारी आमदार शेळके यांना देण्यात आली आहे.
हे पण वाचा,
खासदार बारणे व आमदार शेळके यांची पुणे महानगर नियोजन समितीवर नियुक्ती
आमदार सुनिल शेळके शेतकऱ्यांच्या पाठीशी; शिक्के काढण्याच्या वादात बाळा भेगडे पडले तोंडघशी
जनतेला महागाईच्या आगीत ढकलण्याचे पाप भाजप सरकार करत आहे; आमदार शेळके यांची टीका