मुंबई: राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही जिल्ह्यात कोरोना नियम शिथील केले आहेत. दुनाकाच्या वेळात बदल करण्यात आल्या असल्या तरी अद्याप मुंबई करांना दिलासा मिळाले नाही. मुंबई लोकल सेवा अजूनही बंद आहे. मुंबई लोकल सेवा लवकरात लवकर सुरु करावी यासाठी आता मनसे आक्रमक झाली आहे.
हे पण वाचा: राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर बघून, आख्खी भाजप कामाला लागली; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
मुंबई लोकल प्रवासाबाबत मनसेने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बार कौन्सिलने यापूर्वीच याचिका दाखल करुन, दोन लस घेतलेल्या वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. त्यातच आता मनसेने हस्तक्षेप याचिका दाखल करुन सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाची लावून धरली आहे. या याचिकेवर आता उद्या ५ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
हे पण वाचा: पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला. मुंबई लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्यास सर्वसामान्य जनतेला अद्यापही परवानगी न दिल्यावरुन देशपांडेंनी ठाकरे सरकारला ट्विटरवरुन चिमटे काढले.
हे पण वाचा: झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, म्हणून मनसे आक्रमक झाली आहे. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याविषयी पत्र लिहिलं होतं. त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला इशारा दिला. ज्यांनी लसीचे २ डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर मनसेला रेलभरो करावं लागेल, असं त्यांनी म्हटलं होतं.
Read Also :
- राज्यपालांचं जे स्थान आहे त्याला धक्का देण्याचं काम केलं जातय – चंद्रकांत पाटील
- सामान्यांचं स्वप्न सत्यात उतरणार, यंदा म्हाडा ९ हजार घरांची लॉटरी काढणार
- “शिवसेनेत नाकारल म्हणून बेताल वक्तव्य ,” चित्रा वाघ यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर
- मराठा आरक्षण: ‘केवळ राज्यांना अधिकार देऊन फायदा नाही!’ अशोक चव्हाण म्हणतात….
- ब्रेकिंग! १०२ व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षणाचे अधिकार आता राज्यांना मिळणार