औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ सप्टेंबरला औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार असून, त्यांचा हा दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले असून, त्यांच्या नेतृत्त्वात MIM कार्यकर्ते विमानतळापासून ते नियोजित कार्यक्रम स्थळापर्यंत शहराच्या न झालेल्या विकासाबद्दल धन्यवादाचे फलक घेऊन आंदोलन करणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चा-MIM आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा गाजण्याची शक्यता
तसेच, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्तेसुद्धा आक्रमक झाले असून, औरंगाबाद दौऱ्याच्या वेळी मुख्यंत्र्यांची गाडी रोखू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी रोखून आरक्षणाशी संबंधित जीआर त्यांची होळी त्यांच्याच समोर करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे. दरम्यान, MIM-मराठा क्रांती मोर्चानंतर आता, धनगर समाज आणि मनसेनं दंड थोपटले असून, त्यामुळे, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला आता विरोध वाढताना दिसत आहे.
मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, संभाजीराजे कडाडले…
मनसेने आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद महापालिकेत, सत्ताधारी शिवसेनेने पाणी पुरवठा योजनेत औरंगाबादकरांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप मनसेने केला असून, मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे आणि सुमित खांबेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
“माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल”
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेकडून शहरात ‘सुपर संभाजीनगर’ पुस्तिकेचे वाटप करण्यात येत आहे. यातून पक्षाकडून शहरात विकासकामे करण्यात आली, त्यांची यादी सांगितली आहे. यावर एमआयएमकडून निशाणा साधण्यात आला आहे. नागरिकांना ५ दिवसांच्या फरकाने पाणी उपलब्ध होते, काही ठिकाणी गढूळ पाणी येते, राज्य सरकारच्या धोरणामुळे अजूनही असंख्य तरुण बेरोजगार आहेत, यावरून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपरोधात्मकरित्या ‘धन्यवादा’चे बॅनर झळकावून आंदोलन करण्यात येणार आहे.
Read Also :
- चित्राताई, उद्यापासून बदामाचा खुराक सुरू करा, बुद्धीला चढलेला गंज कमी होईल – रुपाली चाकणकर
- स्वप्न पुर्ण झालं: लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांसह दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
- परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा झटका; याचिका फेटाळून लावली
- पत्नीला न सांगताच सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविलेला; नितीन गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा
- संभाजी ब्रिगेड-भाजप युती? चंद्रकांत पाटील यांनी दिली सूचक प्रतिक्रिया!